महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमुळे सध्या अजितदादा पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.खरे तर "काँग्रेसी संस्कृतीत फिट्ट न बसणारे असे जे " ते अजितदादा असे त्यांचे वर्णन केले तर ते फारसे चुकीचे नसेल.कारण कुठल्याही पण त्यातल्या त्यात अडचणीच्या गोष्टीवर कधीच कुठलीही प्रतिक्रिया न देणे,त्वरित तर त्याहून नाही अशी काँग्रेसजनांची खरे तर ख्याती आहे.अडचणीची ती गोष्ट किंवा तो मुद्दा अशा पद्धतीने लळत-लोंबकाळत ठेवायचा कि नंतर तो आपोआप बाजूला पडतो नि लोकं देखील कालांतराने तो विसरतात,हे वरवर दिसायला अतिशय साधे पण अंमलात आणायला अतिशय कठीण असे टेक्निक वारंवार पण अतिशय खुबीने काँग्रेसजन वर्षानुवर्षे वापरत आले आहेत.तथापि अजितदादा मात्र त्याला अपवाद आहेत.ते त्वरित रीअँक्ट होतात अन मिडीयाला आयतेच खाद्य मिळते.तसे दादा ह्या प्रकरणा व्यतरिक्त सुद्धा ह्या ना त्या निमित्ताने तसे चर्चेत होतेच,अन त्यांच्या काकांना,म्हणजेच शरद पवारांना मधे-मधे हस्तक्षेप करणे भाग पडायचे.
पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागे लाऊन दिलेल्या ह्या बँकेच्या प्रकरणांमुळे ते फारच अडचणीत आले आहेत,त्या मुळे माझ्या सारख्या सामान्य नागरिकाच्या मनात खालील कपोलकल्पित चित्र उभे राहिले.सगळी व्यक्तिमत्वे हि खूपच मोठी असल्याने त्यांचे सर्व भावमुद्रा असणारे त्यांचे वेगवेगळ्या प्रसंगी घेतलेले,काढले गेलेले फोटो गुगल इमेज मध्ये सहजगत्या उपलब्ध असतात/आहेत ते केवळ मी माझ्या बालबुद्धी प्रमाणे संकलित करून,त्यात काल्पनिक संवाद घालून हे पोस्ट तयार केले आहे,अर्थातच त्याचा वास्तवाशी काही एक संबंध नाहीये हे आपणां सारखे सर्व सुज्ञ वाचक जाणतातच.पण झाल्या प्रकार बद्दल सामान्य नागरिक अगदी बाकी काही नाही तर ह्या प्रकारा कडे थोड्या विनोदी नजरेने तर पाहू शकतोच ना ? तुम्हाला काय वाटतंय ते पाहून तुम्ही ठरवालच म्हणा !
बसं..... ह्या पलीकडे जाऊन, ह्या प्रकारात सुद्धा अजून काही वेगळ होऊ शकेल असं निदान आत्ता तरी वाटत नाही,खरं कि नाही ? तुम्हाला काय वाटतं ?
ह्या पोस्ट मधील सर्व चित्रे हि गुगल इमेजच्या सौजन्याने.धन्यवाद गुगल नि ते मूळ छायाचित्रकार.
आजच दैनिक सकाळ मध्ये एक बातमी छापून आलीये.कोण्या एका म्हणे अमित जाधव ह्या व्यक्तीने गेल्या काही दिवसात फेसबुक वर अजितदादा पवार यांच्या बद्दल शिवराळ भाषेतील बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करून खळबळ माजवून दिली आहे.खरे तर सभ्य भाषेतील उपहासात्मक टीका हा मराठी मध्ये नवीन प्रकार नाहीये,तथापि अशा प्रकारचे लेखन करताना मुळात,त्या लेखकाला काही पथ्ये पाळणे बंधनकारक असते.कारण केवळ तुमचे म्हणणे काय आहे किंवा नक्की काय लिहिले आहे हे बघण्याच्या उत्सुकते पोटीच लोक तुमच्या पर्यंत पोहोचत असतात,न कि तुमचे म्हणणे त्यांना पटले असते म्हणून,तथापि अनपेक्षित मिळत असलेल्या वाढत्या महत्वामुळे,नि फुकटच्या प्रसिद्धी मुळे बऱ्याच वेळेला ती लेखक व्यक्ती वाहवत गेल्याचीच उदाहरणे आहेत.ह्या वाहवत जाण्याने ज्या व्यक्तीची ते बदनामी करत असतात त्यांचे समाजातील स्थान, त्यांचे कर्तुत्व,हे ते लोक विसरून जातात.मुळात त्या व्यक्तीवर काही तरी लिहावे असे तुम्हाला वाटणे हि खरे तर तुम्ही त्या व्यक्तीला दिलेली पावती असते.प्रस्तुत अमित जाधव ह्या व्यक्तीला भले दादांचे विचार किंवा कदाचित दादा हे एक व्यक्ती म्हणून आवडत नसतील तथापि ,दादांचे रोखठोक,दरारायुक्त,क्वचित प्रसंगी तापट वाटणारे,,बोलताना थेट समोरच्याचा डोळ्यात डोळे घालून बघणारे व्यक्तिमत्व हे ते पालक मंत्री असलेल्या पुण्यात नि पिंपरी चिंचवड मध्ये अनेक समाजोपयोगी कामे करताना अतिशय उपयुक्त ठरले आहे,नि हीच गोष्ट आता सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना असणार ह्या बद्दल दादांना जवळून ओळखणारे लोक सांगतील ह्यात शंका नाही.त्यांच्यावर सध्या सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपा बाबत सत्य-असत्य,वास्तवता-काल्पनिकता हि यथावकाश लोकां पुढे येईल वा न येईल,तथापि त्यांचे वा अगदी इतर कोणाचेही ह्या प्रकारे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणे हे केवळ निंदनीय नव्हे तर अपराधात्मक आहे,नि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ए)नुसार दंडनीय अपराध आहे,नि अशा प्रकारच्या गुन्ह्यास कायद्या मध्ये तीन वर्ष पर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अन त्या मुळेच व्यक्तिस्वातंत्र्यावर पूर्ण विश्वास असल्याने,टीकेचे येथे सुद्धा स्वागतच आहे,असे आमचे सांगणे पण फक्त ती सभ्य भाषेत असावी अशी आमची माफक अपेक्षा असण्यात चूक काय ते बरे ?
उत्तर द्याहटवाinteresting :)
उत्तर द्याहटवा