१९५० च्या सुमाराची काही फिल्मी मासिके चाळली असता असं लक्षात येत कि,काही
मोजक्या ठराविक अभिनेत्री वगळता त्या काळी इतर कुणाला फारसा वाव नव्हता, किंवा तो पर्यंत चांगल्या घरातील स्त्रिया सरसकट या क्षेत्राकडे फार मोठ्याप्रमाणावर आकर्षिल्या गेल्या नव्हत्या.त्या मुळेच त्या काळात सुरैया ,मधुबाला,कामिनी
कौशल, १९५० नंतर नर्गिस आणि इतर अजून २-४ जणी यांचे वर्चस्व सहजगत्या दिसून येते.
१९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणी
नंतर सर्वात मोठे नुकसान झाले असेल तर ते त्या काळच्या चित्रपट सृष्टीचे ,कारण
फाळणी पर्यंत अखंड भारताच्या सिनेमांना ,मग तो अगदी व्ही.शांताराम यांचा कुंकू
,माणूस किंवा अगदी शेजारी हा सिनेमा कां असेना, त्यांना तिकडे पार पूर्वेला त्या काळच्या
बर्मा म्हणजेच आत्ताच्या ब्रह्मदेश पर्यंत आणि पश्चिमेला पार अफगाणिस्तान पर्यंत
बाजारपेठ अगदी सहजच खुली होती.
पगारी अभिनेत्यांना पदरी बांधून त्या काळी चित्रपट संस्थांनी जे काही कमावले
त्याची तुलना आजच्या काळात अगदी दोन पाचशे कोटी रुपये कमावणाऱ्या सध्याच्या
सिनेमांना सुद्धा नाही. आज पासून त्या काळातील काही सिनेमांच्या जाहिराती आणि नायक
–नायिकांचे अतिशय दुर्मिळ फोटोग्राफ्स मी शक्य होईल तसे आपल्या भेटीस आणणार
आहे.आशा आहे कि,त्या जुन्या स्मृतींना उजाळा देणे आपल्यापैकी काहींना आवडेल.
या चित्रमाले करिता त्या काळातील बाबुराव पटेल यांच्या गाजलेल्या फिल्म इंडिया, आणि काही इतर मासिकांची मदत घेतली आहे. यातील जवळपास सर्वच फोटोग्राफ्स आपण प्रथमच पहाणार
आहात असा माझा अंदाज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा