बिंदूला फटाका म्हणल्याने काहीजण बावचळतील पण ,सत्तरच्या दशकातील बऱ्याच हिरॉईन्स , त्यांच्या सिनेमात ही आहे म्हणल्यावर टरकायच्या.कारण तब्बल पाच फूट सहा इंच
उंची , उत्कृष्ट फीचर्स ,सर्वसाधारण स्त्रियांच्या तुलनेत उफाड्याचा
पण कमनीय बांधा आणि गोरीपान कातडी असे
जातिवंत सौंदर्य लाभलेली बिंदू ,पडद्यावरच्या पेक्षा
प्रत्यक्षात अधिकच सुंदर दिसायची.तिची अतिशय मुलायम तेजस्वी गोरीपान त्वचा , आणि जातिवंत डबलहाडी सौंदर्य वास्तवते
मध्ये सुद्धा कित्येक पुरुषांना घायाळ करत असे.
एका यशस्वी गुजराती निर्मात्याच्या (नानूभाई देसाई) घरात १७ जानेवारी १९५१ ला जन्मलेली
बिंदू,१९६७ साली
वडील वारल्याने पोरकी झाली. शिक्षणात फारसा रस नसलेली बिंदू , घरची जबाबदारी अंगावर पडल्याने लगेच तिच्या अंगभूत अॅसेटस् चा विचार करत ,वडिलांच्याच क्षेत्रात म्हणजे सिनेमा क्षेत्रात आली.हिला हिच्या चित्रपट
क्षेत्रातील करियर साठी संपूर्ण आयुष्यभर
प्रोत्साहन देणारा बालमित्र चंपक झवेरी याच्या सोबत हिने इथे येण्या अगोदरच लग्न केलेलं
होते.त्या मुळे भविष्यात सुद्धा हिच्या
पुढे कधी कुणाची तिने डाळ शिजू दिली नाही.
हिच्या सिनेमातल्या अदाकारीवर लोक त्या काळात इतके दीवाने होते कि, बिंदूला एकदा मुंबईतल्या तिच्या रहात्या
घरा जवळील पोलीस चौकीत जाऊन कम्प्लेंट नोंदवणे भाग पडले होते.कारण काय होते तर
तिच्या वरच्या मजल्यावरच्या फ्लॅट मध्ये कुणी एक महाभाग रस्त्यावरच्या हिच्या
बिल्डींग जवळ लावलेल्या जाहिरातीच्या होर्डिंग वर चढून रात्रीच्यावेळी हिच्या
खिडकीतून डोकावून बघायचा प्रयत्न करायचा म्हणून.आता बोला.
१९७९ नंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्या मुळे हिला डान्स या तिच्या
रोजी-रोटीच्या कलेवर पाणी सोडावे लागले होते.त्या मुळे नंतरच्या काळात चरित्र
खलनायिका,खाष्ट सासू अशा भूमिका करत हिने तिचे करियर
सुरु ठेवले. नंतर-नंतर तर विनोदी भूमिका सुद्धा हिच्या कडे चालून आल्या व त्यात
सुद्धा तिने आपली छाप पाडली.तर अशी ही बिंदू चित्रपट क्षेत्रातील निवृत्ती
नंतर सध्या पुण्याच्या कोरेगाव पार्क
मध्ये निवांत व्यतीत करत आहे.
आजचे तिचे गाजलेले प्रसिद्ध कॅब्रेट सॉंग "जंजीर" मधील, आणि पाठोपाठ ज्या गाण्याने तिने तिची प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पडले ते मेरा नाम है शबनम हे "कटी पतंग" मधील.
आजच्या लेखासाठी सहकार्य यू ट्यूब आणि इन्टरनेट ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा